Login

भुतबंगल्याचा कहर | भयकथा | भाग ४

It Is A Story Of Haunted House Of A Witch And A Family.
भुतबंगल्याचा कहर | भयकथा | भाग ४(शेवटचा भाग)

आत पोहोचताच अचानक घराचा दरवाजा बंद झाला. ते बघून बाहेर असलेले सगळे घाबरून गेले. ते अनिकेत आणि साहिलला हाका मारत देवाची प्रार्थना करू लागले.

आत भरपूर अंधार होता साहिलने विशाल काढून टॉर्च आणली होती ती चालू केली. तरी आत जास्त काही त्यांना दिसत नव्हत. त्याने अनिकेतला हाका मारायला चालू केलं.

पण समोरून अनिकेतच्या अवजा ऐवजी दुसराच कर्कश विकृत हसण्याचा आवाज येऊ लागला. गुरुजींच्या एका हातात तांब्या आणि दुसऱ्या हातात माळ होती. ते सर्वत्र बघत काही मंत्र पुटपुटू लागले.

तेव्हा समोरचा हसण्याचा आवाज अचानक थांबून एका विचित्र घोगऱ्या आवाजात कोणी तरी बोलू लागलं,"कशाला आला आहेस परत ह्याचा मृत्यू बघायला का? निघून जा इथून नाही तर मी कोणालाच सोडणार नाही. हा माझा शेवटचा तिसरा घास आहे हा घेऊन मी पुन्हा मनुष्य रुपात येऊन अमर होईन." इतकं बोलून ती विचित्र शक्ती पुन्हा जोरजोरात हसू लागली.

तिचं बोलणं ऐकून गुरुजींनी आपले मंत्र उच्चार थांबवले आणि बोलू लागले,"अगं मूर्ख चेटकिने तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. म्हणूनच देवाने मला इथे पाठवलं आहे. तुझा अंत आता जवळ आलाय. खूप त्रास दिलास तू सर्वांना आता त्या लहान मुलाला सोड नाही तर...." इतकं बोलून त्यांनी हातातील तंब्यामधून हातात घेतलं आणि सर्वत्र शिंपडल.

त्यामुळे ती चेटकीण जोर जोरात किंचाळू ओरडू लागली. साहिल गुरुजींच्या परवानगीने अनिकेतला शोधायला दुसारी कडे निघून गेला.

त्याला रोखण्यासाठी ती चेटकीण खूप प्रयत्न करू लागली. त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागली पण त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. त्याला त्याच्या सुरक्षेसाठी गुरुजींनी काही वस्तू सोबत दिली होती. हळू हळू त्या चेटकिनीची शक्ती कमी पडू लागली.

साहिल अनिकेतला हाक मारत स्वयंपाक घरात पोहोचला. तिथे जाऊन त्याला समोरून काही अस्पष्ट ऐकू येऊ लागले,"चाचू..... चाचू....." तो अनिकेचा आवाज होता. तो रडत रडत साहिलला हाक मारत होता.

पण साहिलला कळेना झालं की तो आवाज नक्की कोठून येतो आहे. तो नीट लक्ष देवून शोध घेत बोलू लागला,"अनिकेत बाळ तुझं चाचू आलाय तुला वाचवायला घाबरु नकोस काही नाही होणार. तू कुठे आहेस मला सांग बरं?"

त्याच्या प्रश्नावर अनिकेत रडायचं थांबवून बोलू लागला,"नाही माहित चाचू इथे खूप अंधार आहे श्वास गुदमरतो आहे ये ना लवकर मला इथून बाहेर काढ."

त्याच ते बोलणं ऐकून साहिल पूर्ण पने गोंधळून गेला त्याला अनिकेतचा आवाज तर येत होता पण तो त्याला कुठेच दिसत नव्हता. तरी तो तसाच त्याचा शोध घेऊ लागला.

चालता चालता त्याला कसला तरी आवाज येऊ लागला. तो थांबला की तो आवाज देखील थांबत होता. तो त्याच्या बुटांचा आवाज होता. त्या आवाजामुळे त्याला कळलं की खाली मजबूत जमीन नसून लाकडाची जमीन आहे. त्या मुळे तो चालताना तसा आवाज येत होता.

तो लगेचच खाली बसला आणि त्याने त्या लाकडावर आवाज करत अनिकेतला हाक दिली तिथून जमिनी खालून त्याला अनिकेतची हाक ऐकू आली.

त्याला आता समजले होते अनिकेत कुठे आहे ते. पण खाली जाण्यासाठी काही रस्ता सापडत नव्हता. त्याने तिथच अजून बाजूला शोध घेतला आणि त्याला ते लाकूड तोडायला एक हत्यार मिळेल. त्याने लगेचच ती जमीन तोडायला सुरुवात केली.

त्यांना बाहेर येण्यास उशीर होत होता म्हणून बाहेर सगळ्यांचा जीव कासावीस होऊ लागला. ते बाहेरून दरवाजा खोळण्याचा तोडण्याचा प्रयत्न  करू लागले पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता.

आत गुरुजींनी त्या चेटकिणीची शक्ती दाबून ठेवली. तिला काहीच करता येत नव्हते. ती फक्त जोरजोरात किंचाळत होती ज्यांनी बाहेरची मंडळी आणखीनच घाबरून गेली.

तिथे आत साहिलने बघता बघता जमिनीचा बराच भाग तोडला आणि त्यांनी टॉर्च सकट आत प्रवेश केला. आत अजूनच अंधार पसरलेला होता. त्यांनी अनिकेतला हाक देताच अनिकेत त्याला येऊन बिलगला. त्याने लगेच त्याला उचलून घेतले.

इतक्यात गुरुजी देखील तिथे आले. त्यांनी देखील त्या जमिनीच्या खालच्या भागात प्रवेश केला. आत जाऊन त्यांनी आजू बाजूला टॉर्च मारून शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना तिथे जुनी काळ्या जादूची पूजा मांडलेली दिसली.

ते बघून गुरुजी अजून पुढे चालत जाऊ लागले. तिथे त्यांना कसलासा कुबट घान वास येऊ लागला ज्यामुळे त्यांनी मागे फिरून साहिलला बाहेर सोडून येण्यास सांगितले. बहुतेक त्यांना समजले होते की तिथे काय आहे.

साहिल लगेचच अनिकेतला घेवून बाहेर गेला. आता बाहेर जाताना त्याने सहज दरवाजा उघडला. बाहेर त्याच्या घरच्यांसोबत बरेच लोकं जमा झाले होते. अनिकेतला विशालकडे देवून त्याने पोलिसांना बोलवून घ्यायला सांगितले आणि तो पुन्हा आत गुरुजी होते तिथे निघून गेला.

आत त्या जमिनी खाली थोड्या अंतरावर गुरुजी बसून मंत्र उच्चार करत होते. साहिल हळूच चालत त्यांच्या बाजूला आला आणि त्यांच्या समोर बघून त्याची बोबडीच वळली.

समोर ३ मृत्यू देह पडलेले होते. खूप दिवस तशेच असल्यामुळे त्याचाच कुबट घान वास येत होता. ते बघून साहिल मागे वळून तिथून लांब गेला.

गुरुजींनी साहिल कडून किश्यातील लायटर मागितला. साहिलला कधी तरी सिगारेट ओढायची सवय होती हे कसे काय माहित पण गुरुजींना समजले होते. ह्यावर जास्त विचार न करता साहिलने ते त्यांच्या हातात दिले.

त्यांनी त्यातील दोन लहान मुलांचे मृत्यू देह बाजूला उचलून ठेवले आणि त्या तिसऱ्या त्या म्हाताऱ्या चेटकिनीच्या मृत्यू देहाला काही मंत्र म्हणून तिथेच जाळून टाकले. तिला अग्नी देताच जोरजोरात ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज येऊ लागला.

काही वेळातच पोलिस तिथे पोहोचले. साहिलने त्यांना सगळी घटना समजावून सांगितली. त्या भागातल्या पोलिसांना देखील त्या घरा बद्दल माहित होत. त्यांनी त्या दोन मृत्यू देहांना त्यांच्या परिवाराला सुपूर्त केले.

जसजसे त्या चेटकीनीचे शरीर जळत होते तसतसे बाहेर उजडत होत. कधी रात्र निघून गेली तिथे कोणालाच कळलं नव्हत. त्या भयानक रात्री नंतर साहिल गुरुजींसोबत बाहेर आला.

विशाल आणि सुगंधाने त्याचे खूप आभार मानले त्यांच्या सोबत तिथे उपस्थित सर्वांनीच त्याचे आभार मानले तेव्हा तो बोलू लागला,"मी फक्त निमित्त आहे. हे सगळ गुरुजींमुळे घडल आहे. ते नसते तर हे कधीच शक्य झालं नसतं त्यांच्यामुळेच आता हे संकट कायमचं टाळलं आहे."

इतकं बोलून तो गुरुजींना नमस्कार करायला मागे वळून बघतो तेव्हा तिथे कोणीच नसतं. तिथे खाली त्याला पादुका आणि त्यावर चाफ्याचे फुले ठेवलेली दिसली. सगळे लोकं त्या पादुकांना स्पर्श करून नमस्कार करू लागले. त्यांच्यामुळे सगळ्यांच्या मगच संकट कायमचं टळून गेलं. ती मंतरलेली भयानक रात्र पुन्हा त्यांच्या आयुष्यात कधीच नाही आली.

समाप्त.

🎭 Series Post

View all